logo

*आचारसंहितेचे नियम मोडण्याचा अधिकार भाजपाला कुणी दिला..? *

पैठण प्रतिनिधी
तोहित पटेल
गेल्या आठ दिवसांपूर्वी एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष निसार बागवान यांनी भाजपाचा प्रचार रथ अडवून विचारपूस केली असता माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी निसार बागवान यांना उलट दमदाटी करत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. संबंधीत प्रचार रथाबाबत प्रथमतः निसार बागवान यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना संपर्क केला असता पथक पाठवतो असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर बटुळे नामक व्यक्ती संबंधित ठिकाणी आली असता त्यांना वाहनाच्या चालकाने काही कागदपत्रे व्हाट्सएप केली. निसार बागवान यांनी यावेळी संबंधित भाजपा पदाधिकारी व वाहन चालकाला फक्त एवढीच विचारपूस केली की आपण स्थानिक प्रशासनाची परवानगी घेतली आहे का..?
एवढाच प्रश्न विचारल्याने भाजपाच्या माजी नगराध्यक्षाने व संबंधित पदाधिकाऱ्यांनी निसार बागवान यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. यात
कलम 323, 504, 506,107 NC
दाखल करण्यात आली असून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप निसार बागवान हे करत आहेत. सत्तेच्या नशेत भाजपाचे नेते व पदाधिकारी इतके बेधुंद झाले आहेत की ते आता संविधानाचीही पायमल्ली करण्यास घाबरत नाही. जबाबदार आणि जागरूक नागरीक म्हणून निसार बागवान यांनी विचारपूस केली असता त्यांच्यावर दबाव टाकून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न संबंधित लोकांनी केला. शहरामध्ये मुस्लिम युवकांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे. यापूर्वीही अस्लम भैय्या पठाण यांचे शहरातील नाथषष्ठीचे शुभेच्छा देणारे बॅनर काढून टाकले व इतरांचे तसेच ठेवण्यात आले. यातून प्रशासन आणि भाजपाचे नेते काय सांगू इच्छितात..? सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी धडपडणाऱ्या मुस्लिम युवकांवर जर भाजप अशापध्दतीने खोटे गुन्हे दाखल करुन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना जशाच तसे उत्तर आम्ही नक्कीच देऊ. आता आम्ही आमची भुमिका ही मांडणार आहोत. असा निर्णय निसार बागवान यांनी घेतला.

10
700 views